Advertisement

किरकोळ कारणावरून एकावर कत्तीने वार

प्रजापत्र | Friday, 03/03/2023
बातमी शेअर करा

बीड दि.३ (प्रतिनिधी)-पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेलेल्या चालकाने रिक्षा चालकाला रिक्षा बाजुला घे, असे म्हणताच रिक्षा चालकाने कत्तीने वार केल्याची घटना काल माजलगाव परभणी रोडवरील पंचदीप पेट्रोल पंपावर घडली. या प्रकरणी माजलगाव ग्रामीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अशोक पंडित थावरे (वय-३२ रा. आनंदगाव ता. माजलगाव) हे पेट्रोल भरण्यासाठी आपला ट्रॅक्टर घेऊन पंचदीप पेट्रोल पंपावर काल गेले होते. त्या वेळी त्याठिकाणी अजय गायकवाड (रा. लऊळ ता. माजलगाव) हा आपला रिक्षा घेऊन उभा होता. रिक्षा बाजुला घे मला डिझेल भरायचे आहे, असे म्हणताच अजयने अशोकच्या मानेवर कत्तीने वार केला. तो वार अशोकने हातावर अडवल्याने त्याचा जीव वाचला. त्यानंतर अजयने अशोकला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार अशोकने माजलगाव ग्रामीण पोलिसात दिली आहे. या प्रकरणी अजय गायकवाड याच्या विरोधात 307, 504, 506 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. जोनवाल हे करत आहेत.
 

Advertisement

Advertisement