बीड दि.३ (प्रतिनिधी)-शहरातील मुख्य रस्त्यांचे कायमस्वरूपी काम व्हावे या उदात्त हेतूने माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि तत्कालीन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून कोट्यावधींचा निधी बीड शहरासाठी खेचून आणला पहिल्या टप्प्यात 88 कोटी रुपयांची कामे झाली तर दुसऱ्या टप्प्यात १२ रस्त्यांची ६९ कोटींची कामे होणार आहेत, युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाल्यानंतर स्वतः लक्ष देऊन सुरू असलेल्या पहिल्या तीन रस्त्यांची कामे पूर्ण करून घेतली आहेत दर्जेदार रस्ते करून घेऊन नागरिकांना कुठलीही अडचण येऊ न देता या तीनही रस्त्यांचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे येत्या आठवडाभरामध्ये हे तिन्ही रस्ते नागरिकांसाठी खुले होणार आहेत.
बीड शहरात कायमस्वरूपी सिमेंट काँक्रेटची रस्ते आणि नाल्यांची कामे व्हावीत यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतर 88 कोटी रुपये मंजूर झाले त्यात १६ रस्त्यांची कामे पूर्ण झाली.उर्वरित रस्त्यांची कामे देखील करून घेणार आहोत असे आश्वासन जाहीर सभेत दिल्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि तत्कालीन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून दुसऱ्या टप्प्यातील बारा रस्त्यांसाठी ६९ कोटी रुपये मंजूर करून आणले.कामे सुरू असताना नागरिकांना कुठलेही अडचण होणार नाही याची काळजी डॉ योगेश क्षीरसागर यांनी आधीपासूनच घेतले होते. पिंपळगव्हाण रोड, दीप हॉस्पिटल ते रिपोर्टर भवन आणि जुना मोंढ्यातील रस्ते अशा तीन रस्त्यांची कामे प्रारंभी हाती घेण्यात आली. वारंवार भेटी देऊन पहाणी करत आवश्यक बाबी लक्षात घेऊन सूचना देऊन रस्त्याचे काम दर्जेदार करून घेण्यात डॉ योगेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला अवघ्या काही दिवसातच हे तिन्ही रस्ते अंतिम टप्प्यात पूर्ण करून घेतले येत्या आठवडाभरामध्ये हे तिन्ही रस्ते नागरिकांसाठी खुले होणार आहेत या भागातील व्यापारी नागरिक वाहनचालक यांनी डॉ क्षीरसागर यांना धन्यवाद दिले आहेत उर्वरित रस्त्यांची कामे देखील याच पद्धतीने होतील नागरिकांना कुठलीही अडचण येणार नाही याची दक्षता घेऊनच पुढील रस्त्यांची कामे होतील असे डॉ योगेश क्षीरसागर यांनी सांगितले आहे.