Advertisement

माजलगावात भर रस्त्यात माजी आमदाराच्या पुतण्याला लुटले !

प्रजापत्र | Thursday, 23/02/2023
बातमी शेअर करा

माजलगाव - शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालयासमोर येथील माजी आमदाराच्या पुतणे असणाऱ्या वृद्धाला लुटल्याची घटना आज (गुरुवारी) दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. स्थानिक युवकांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे पसार होण्यास यशस्वी झाले. दिवसा ढवळ्या भर रस्त्यावर चोऱ्या होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, माजलगाव शहरात मागील महिना भरापूर्वी एका वृद्धाला दिवसाढवळ्या लुटल्याची घटना घडली होती. त्याचाच पोलिसांना तपास लागलेला नाही. तर आज (दि.२३) गुरुवारी दुपारी १ वाजता शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालयाच्या समोर अनंतराव शेषेराव जगताप (वय ६५) हे दररोज प्रमाणे त्यांच्या दुकांवर जात होते. यादरम्यान चोरट्यांनी त्यांना थांबवून तुम्ही अंगावर इतके सोने कशाला घातले, ते काढून ठेवा. यावर अनंतराव हे गळ्यातील लॉकेट, हातातील दोन अंगठ्या काढून ठेवत होते. तेवढ्यात चोरट्यांनी लॉकेट व अंगठ्या ह्या हिसकावून पळून जाऊ लागले. त्यावर वृद्ध अनंतराव ह्यांनी चोरट्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. यामधे अनंतराव यांचे दोन तोळ्यांचे लॉकेट व एक – एक तोळ्यांच्या दोन अंगठ्या असे २ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला. अनंतराव जगताप हे येथील माजी आमदार बाजीराव जगताप यांचे पुतणे आहेत. दिवसा ढवळ्या होत असलेल्या चोऱ्यामुळे पोलिसाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Advertisement

Advertisement