बीड-शहरातील बस स्टँड समोरील जुन्या लाईफलाईन हॉस्पिटलजवळ एका अंध महिलेच्या तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना काल रात्री उशिरा घडली होती. याप्रकरणात पहाटेच्या सुमारास एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.दरम्यान या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
एका तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीला खाऊचे आमिष दाखवून एका शौचालयाच्या परिसरात घेऊन जाण्यात आले. तिथे गेल्यानंतर एका अल्पवयीन मुलाने तिच्यावर अत्याचार केला.यानंतर पीडित मुलगी मोठमोठ्याने ओरडायला लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तिच्याकडे धाव घेतली.तोपर्यंत आरोपी फरार झाला होता.दरम्यान पीडितेने घडलेल्या प्रकारची आपल्या आईला माहिती दिल्यानंतर बीड शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला होता. घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी संतोष वाळके, पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्यासह फॉरेन्सिक लॅबची टीम रात्री दाखल झाली. त्यानंतर पीडितेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सदर घटना गंभीर असल्याने सुरुवातील सामुहिक अत्याचार असल्याच्या चर्चा होत्या. बीड शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणाचा जलदगतीने तपास करीत थोरातवाडी येथून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. अखेर त्याने गुन्हयाची कबुली दिल्याची माहिती असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पोलीस अधिक्षक स्वत: होते पहाटेपर्यंत तळ ठोकून
तीन वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.सुरुवातील हा प्रकार सामुहिक अत्याचार असल्याच्या चर्चा होत्या. या प्रकरणातील आरोपी हे नशेखोर असावेत असा पोलिसांचा अंदाज होता. मात्र तपासातून हा प्रकार वेगळाच असल्याचे समोर आले. शहरातील पेपर वाटणाऱ्या एका मुलाने पीडितेचे लैंगिक शोषण केले. दरम्यान सुरुवातील या अल्पवयीन आरोपीने गुन्हयाची कबुली दिली नाही. दोन तास पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे दिली. मात्र त्यानंतर पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पहाटे पाच वाजेपर्यंत शहर पोलीस ठाण्यात बीड पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, उपअधिक्षक संतोष वाळके आणि पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्या समवेत पोलीस कर्मचारी तळ ठोकून उभे होते.
आठ तासाच्या आत आरोपी ताब्यात
दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून बीड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवी सानप यांनी तपासाची चक्रे गतिमान केली.डीबी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अल्पवयीन आरोपीला आठ तासाच्या आत घरातून ताब्यात घेतले. रात्रीतूनच याप्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण केला. पहाटेपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी ही ठाण्यात ठाण मांडून बसले होते. दरम्यान पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
.