आष्टी -मालकाने मोठ्या विश्वासाने उचल दिली.मात्र उचल फेडण्यापूर्वी एका गवंड्याने पळ काढला.त्याला सापडण्यासाठी त्याचा सहकारी असलेला एक गवंडी आणि मालक त्याच्या घरी गेले.रात्री त्याला कामासाठी परत उचलून आणले,आणि याचा राग मनात धरून त्या गवंड्याने आपल्या सहकारी असलेल्या गवंड्याचा डोक्यात दगड घालून खून केला.तर मालक झोपलेल्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ईश्वर दत्तु नवसुपे (वय-२७) असे मृत गवंड्याचे नाव असून आरोपी कांतीलाल मारूती काकडे (वय-४०) यास अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.आष्टी तालुक्यातील देविनिमगांव येथील वाळके अनारसे वस्तीवर गोरख नारायण पाचारणे हे त्यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. हे काम मंगरूळ येथील गवंडी ईश्वर दत्तु नवसुपे आणि मजूर कांतीलाल मारूती काकडे करत आहेत. दोघेही बुधवारी काम आटोपून बांधकावरच झोपले होते. गुरूवारी पहाटे साडेसहाच्या दरम्यान मजूर कांतीलाल याने गाढ झोपेतील ईश्वर नवसुपे यांच्या डोक्यात दगड घातला. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी नगरमधील रुग्णालयात हलविण्यात आले मात्र तिथे पोहचल्यानंतर डॉक्टरांनी तपासून ते मृत झाल्याचे घोषित केले.दरम्यान आरोपीने घराच्या मालकाच्या चारचाकी कारवरही ( एमएच.०२,डीजे.२५७४) दगडफेक केली. घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलिस उपनिरीक्षक राहुल लोंखडे, पोलिस हवालदार राजेंद काकडे, संतोष सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतलीया प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात गोरख नारायण पाचारणे यांच्या फिर्यादी वरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे करीत आहे.
प्रजापत्र | Thursday, 26/11/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा