किल्लेधारूर - धारूर शहरातील कसबा विभागात जाधव गल्लीमध्ये राहणारा युवक नारायण अश्रुषा जमाले याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धारूर तालुक्यात सतत सहाव्या दिवशी आत्महत्या करण्याची घटना झाली असून आत्महत्या च्या वाढत्या घटना मुळे प्रशासन मात्र हतबल झाले आहे. धारूर पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. गेल्या काही दिवसांत आत्महत्या करण्याच्या घटना वाढल्या आहेत. दि.१० फेब्रुवारीपासून तालुक्यात दररोज एक आत्महत्या होत आहे. आज धारुर शहरात आत्महत्येची घटना घडली.
बातमी शेअर करा