Advertisement

बसमध्ये चढणार्‍या प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची 15 ग्रॅमची चैन लांबविली

प्रजापत्र | Wednesday, 15/02/2023
बातमी शेअर करा

माजलगाव - एसटी बस मध्ये चढणार्‍या एका प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चैन एका अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊनलांबवली.ही घटना सोमवार दि.14 रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या दरम्यान घडली.बीड येथील नवगन महाविद्यालयातील सेवानिवृत्तप्राध्यापक बाबुराव मारुती कुंभार हे काही कामानिमित्त माजलगाव येथे आले होते. काम उरकून सोमवार दिनांक 14 रोजी वाजण्याच्या ते माजलगाव आगारात बीडला जाणार्‍या बसची वाट पाहत होते. साडेचार वाजण्याच्या दरम्यान परभणी पाटोदा बस आगारात आली.त्यावेळी बीडला जाण्यासाठी ते बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची 15 ग्रॅमची चैन लांबवली. ज्याची अंदाजे किंमत 27 हजार रुपये.हा प्रकार कुंभार यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन पोलिसांना सांगितला. दरम्यान अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही बंद असणार्‍या गाळा क्र.8 मध्ये होऊ लागल्या चोर्‍या.माजलगाव बस आगार सीसीटीव्ही फुटेजच्या निग्राणीत आहे.परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून गाळा क्रमांक 8 मधिल सीसीटीव्ही कॅमेरा बंद आहे.त्यामुळे या बाबींचा फायदा घेत अनेक वेळेस चोरट्यांनी प्रवाशांच्या किमती ऐवजावर आपला हात साफ केला आहे.त्याचप्रमाणे बस आगाराचे सुरक्षा कर्मचारी जागेवर नसतात तर ऑन ड्यूटी पोलीस शिपाईही ऐन वेळेस कुठे गायब होतात याचाही शोध घेण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या आहेत.
 

Advertisement

Advertisement