Advertisement

ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; एक जागीच ठार

प्रजापत्र | Tuesday, 14/02/2023
बातमी शेअर करा

 

माजलगाव : पाथरीहून माजलगाव कडे येत असलेल्या दुचाकीस्वाराला कारखान्याची माल वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायं ६ वाजता सोमठाना येथे घडली.

 

माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील नागेश साधू कोहिनकर (वय ३४) हा पाथरी तालुक्यातील मानोली येथे कार्यक्रमासाठी गेला होता. तो आज मंगळवारी (दि.१४) पाथरी हून माजलगावकडे दुचाकी (MH 44 Y 0136) वरून येत होता. या दरम्यान सोमठाना गावाजवळ आला असता, समोरून येणाऱ्या भरघाव वेगातील ट्रकने (MH 23 W 3101) दुचाकीला चिरडले. यात दुचाकीवरील नागेश साधू कोहिनकर याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल यांनी धाव घेतली असून ट्रक पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.

Advertisement

Advertisement