Advertisement

बीडमध्ये व्यापार्‍याची फसवणूक

प्रजापत्र | Tuesday, 14/02/2023
बातमी शेअर करा

बीड - ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. बीडमधील एका व्यापार्‍याच्या क्रेडिट कार्डमधुन परस्पर रक्कम काढुन घेत त्यानंतर क्रेड अ‍ॅप मध्ये इतर कोणाचे क्रेडीट कार्ड अ‍ॅड करून त्यातुनही अपहार सुरूच असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी व्यापार्‍याच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बीड शहरातील व्यापारी अन्सारी मोहम्मद फहाद मोहम्मद यांनी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की त्यांच्या क्रेडीट कार्डमधुन अज्ञात व्यक्तीने 20 हजार 437 रूपये परस्पर काढुन घेतले. सदरील रक्कम खात्यातुन काढण्यात आल्याचा मॅसेज प्राप्त झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांच्या क्रेड अ‍ॅपमध्ये इतर कोणाचे क्रेडीट कार्ड अ‍ॅड करून त्यातुनही अपहार करणे सुरू असल्याचे समजताच अन्सारी यांनी या प्रकरणात तक्रार दिली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पो.नि.बल्लाळ करीत आहेत.

Advertisement

Advertisement