देशाची भावी पिढी घडवणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस वर्षानुवर्ष तुटपुंजा मानधनावर अहोरात्र सेवा देत आहेत.मात्र सरकार कुठलेही असो आजपर्यंत अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना फक्त आणि फक्त आश्वासने दिली जात आहेत.त्यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भर उन्हात रस्त्यावर उतरत आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या आमच्या मागण्या मान्य करा असे म्हणत भगवान बाबा प्रतिष्ठान येथून काढलेला विराट मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला, यावेळी अंगणवाडी सेविकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या २० फेब्रुवारीपासून राज्यभर बेमुदत संप पुकारण्याचा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाने म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये दोन लक्ष कर्मचारी असून अंगणवाडी सेविकांना दरमहा सुमारे ८३०० रुपये मिनी अंगणवाडी सेविकांना ५८००, मदतनिसांना ४२०० मानधन मिळते. महाराष्ट्र शासन त्यांना मानसेवी समजते. शासन त्यांच्याशी मालक-सेवक असलेले नाते मान्य करीत नाही. त्यांना कमगार कल्याण कायद्याचे कोणतेही संरक्षण आणि लाभ तसेच वाढता महागाईभत्ता मिळत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मनात शासनाप्रति तिव्र नाराजी निर्माण होत आहे. आमच्या मागण्या मंजुर न झाल्यास दि. २० फेब्रुवारीपासून महाराष्ट्रव्यापी बेमुदत संप करण्यात येणार असल्याचा ईशाराही देण्यात आला आहे.
बातमी शेअर करा