बीड - एलआयसी आणि एसबीआयला ८७ हजार कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या गौतम अदाणीची संयुक्त संसदीय समिती आणि सक्त वसूली संचालनालया मार्फत कसून चौकशी करून त्याची मालमत्ता जप्त करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जिल्हा कौन्सिल बीडने एका निवेदनाद्वारे केली आहे. सदरील निवेदन निवासी उपजिलाधिकारी संतोष राऊत यांच्या मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय उद्योजक गौतम अदानी यांच्या आर्थिक व्यवहाराची चिरफाड हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीने केल्यानंतर अदाणी हे जागतिक स्तरावरीत फसवणुकदार म्हणून औळखले जाऊ लागले आहेत. एलआयसी आणि एसबीआयशिवाय त्यांनी देशविदेशात नामधारी (बोगस) कंपन्या काढून शेअर्स खरेदी- विक्रीचीही अब्जावधी रुपयांची फसवणूक केली आहे. या संदर्भात त्या महा आर्थिक घोटाळ्याची चौकशी करा म्हणून विरोधी पक्षाचे प्रतिनिधी संसदेमध्ये मागणी करत आहेते, मा. प्रधानमंत्री या बाबत 'ब्र' सुद्धा काढत नाहीत. भारतीय अर्थव्यवस्थेत हा गुन्हेगारी स्वरुपाचा आर्थिक घोटाळा असूनही प्रधानमंत्री महोदय अदाणीला पाठीशी घालत आहेत.सेबी या संस्थेवर अदाणीचे नातेवाईक कार्यरत आहेत, प्रधानमंत्री मोदी अदाणीच्या विमानातूनच निवडणुकीची प्रचार मोहिम करतात. भाजपच्या निवडणूकीसाठी इलेक्ट्रोल बाँड सह अवैध मार्गानों अदाणीचाच पैसा वापरात येत असतो ही बाब सामान्य जनतेलाही माहित झाली आहे असा आरोप भाकपच्या वतीने निवेदनातून करण्यात आला आहे.यावर कॉ. नामदेव चव्हाण को उत्तमराव सानप, कॉ. ज्योतीराम हुरकुडे, कॉ भाऊराव प्रभाळे, अँड करुणा टाकसाळ, कॉ. अँड नितीन रांजवण कॉ. डी. जी. तोंदळे, लक्षमन वाळकर, कॉ. सुधाकर डोळस, नवनाथ रांजवण इत्यादीच्या सह्या आहेत.
बातमी शेअर करा