माजलगाव - राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झाले असून सोमवारी (दि.१३) माजलगावच्या उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन शुक्रवारी (दि.१७) रास्तारोको करण्याचा इशारा दिला आहे.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकास प्रति क्विंटल 10 हजार रुपये भाव द्यावा,कापसाला १२ हजार भाव मिळावा,शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नये,शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड केलेले काढण्यात यावेत,अतिवृष्टीचे व सततच्या पावसाने झालेल्या पिकाचे नुकसान बाबत शेतकऱ्यांचे अनुदान त्वरीत बँक खात्यात जमा करावीत,शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान ५० हजार रुपये बँक खात्यात जमा करावेत,
शेतकऱ्यांची दोन लाखाच्या पुढील थकीत रक्कमेची कर्ज माफी देण्यात यावी,एपीएल कार्ड धारक शेतकऱ्यांचे बंद केलेली धान्य पुर्वरत सुरू करणे.या मागण्यांचा यात समावेश आहे.दरम्यान वरील प्रश्नांची दखल घेऊन ते मार्गी न लागल्यास १७ फेब्रुवारी रोजी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
बातमी शेअर करा