Advertisement

खासदार रजनी पाटील यांचे निलंबन

प्रजापत्र | Friday, 10/02/2023
बातमी शेअर करा

बीड दि. १० (प्रतिनिधी ) : राज्यसभेतील विरोधकांचा आवाज संसद टीव्ही दाखवीत नसल्याने विरोधकांचे चित्रीकरण  करणाऱ्या राज्यसभा सदस्य रजनी पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी ही कारवाई केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पाटील यांच्या या कृतीवर आक्षेप घेतला होता.

 

राज्यसभेत सध्या विरोधकांनी सरकारला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरु केला आहे. मात्र विरोधकांचा आवाज सभागृहाच्या कामकाजाचे चित्रीकरण करणाऱ्या संसद टिव्हीकडून दाखविला जात नसल्याचे चित्र आहे. सरकारी टीव्ही विरोधकांना दाखवीत नसल्याने काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी गुरुवारी स्वतःच  विरोधकांच्या कामकाजाचे मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रीकरण केले होते. मात्र खा. रजनी पाटील यांची ही कृती देखील सरकारला झोंबली. खा. पाटील यांच्या या कृतीवर मंत्री पियुष गोयल यांनी आक्षेप घेतल्यानंतर शुक्रवारी राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांनी रजनी पाटील यांना राज्यसभेतून निलंबित केले आहे. हे निलंबन अधिवेशन काळासाठी राहणार असल्याची माहिती आहे. सोनिया गांधी यांच्या किचन कॅबिनेट मधील एक नेत्या अशीही पाटील यांची ओळख आहे.  
 

Advertisement

Advertisement