बीड दि.8 : घुरकूलाची तपासणी करुन तिसर्या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी व जमा केल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी केली. कंत्राटी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकासाठी 6 हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी (दि.8) सिरसाळा येथे खाजगी इसमास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दोघांवर सिरसाळा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन रावसाहेब डिघोळे (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, (कंत्राटी) पंचायत समिती परळी), बाळू उर्फ राजू लक्ष्मण किरवले (वय 28, रा.भीमनगर, सिरसाळा) अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदारास रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. या घरकुलाची तपासणी करून तिसर्या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी व जमा केल्याचा मोबदला म्हणून सहा हजार रुपयांची मागणी करून सहा हजार लाच रक्कम खाजगी इसम किरवले यांचे मार्फतीने सिरसाळा येथे स्वीकारली. या प्रकरणी दोघांवरही सिरसाळा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलीस अंमलदार सांगळे, गोरे, गारदे, राठोड, म्हेत्रे यांनी केली.