Advertisement

मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी दिला चोप

प्रजापत्र | Wednesday, 08/02/2023
बातमी शेअर करा

माजलगाव (प्रतिनिधी) - शहरातील नवीन बस स्थानक परिसरात मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना माजलगाव शहर पोलीसांनी चांगलीच अद्दल घडवली. पोलिसी खाक्या दाखवत पोलीसांनी छेड काढणाऱ्या ७ तरुणांना चोप देत, ठाण्यात नेवून चांगलीच हजेरी आज (बुधवारी) दु.१२ वाजण्याच्या दरम्यान घेतली.

शहरातील नवीन बस स्थानक येथे काही टवाळखोर मुलींची छेड काढत असल्याची माहिती आज (दि.८) रोजी १२ वाजता पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांना मिळाली. यावर पोलीस उपनिरीक्षक विजय थेटे यांच्यासह पोलीस हवालदार मोरे, मस्के यांनी बस स्थानकाकडे धाव घेऊन. त्या टवाळखोर तरुणांना छेड काढताना रंगे हाथ पकडत, चांगलाच पोलिसी खक्या दाखवत चोप दिला. काही छेड काढणारे पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना, पाठलाग करून  ७ जणांना ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात हजर केले. ठाण्यात पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी चांगलीच हजेरी या टवाळखोरांची घेतली.

 

माजलगाव शहरात शाळा, कॉलेज व खाजगी शिकवणीच्या ठिकाणी मुलींची छेड छाड खपवून घेतली जाणार नाही. यापुढे थेट शहर पोलिसांच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येईल असे माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी इशारा दिला आहे.

Advertisement

Advertisement