Advertisement

तब्बल 43 अ‍ॅप्सवर बंदी

प्रजापत्र | Tuesday, 24/11/2020
बातमी शेअर करा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणखी एक मोठा डिजिटल स्ट्राईक केला आहे. यामध्ये भारतातील तब्बल 43 अ‍ॅपला ब्लॉक करण्यात आलं आहे. आयटी अ‍ॅक्ट 69 ए अंतर्गत सर्व 43 अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षेसाठी धोका असल्याचं कारण देत या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आल्याचं कारण सरकारकडून देण्यात आलं आहे. 
आयटी कायद्याच्या कलम 69 ए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. बंदी घातलेले सर्व अ‍ॅप्स भारताच्या सार्वभौमत्व, अखंडता, संरक्षण, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

 

 

Advertisement

Advertisement