चकलांबा - गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे गुरुवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास अचानक मोठा स्फोटसदृष्य आवाज झाला. हा आवाज झाल्याबरोबरच अनेक घरे हादरली तसेच काही घरांची पत्रे देखील फडफडली आहेत.हा आवाज कसला होता, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा आवाज चकलांबा परिसरातील हीवरवाडी ,अंधपिपरी,धुमेगाव चोरपुरी,महाडुळा, परिसरातही झाला आहे. त्यामुळे नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बातमी शेअर करा