Advertisement

मुंबई: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा शहरांसह छोटी शहरं आणि ग्रामीण भागातही कोरोनारुग्णांचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा काही निर्बंध लादण्याचा विचार महाविकास आघाडी सरकार करत आहे. तसे संकेत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. राज्यात कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला जातोय. 8 दिवस अंदाज घेऊन काही निर्बंध आणता येतील का? याचा विचार सुरु आहे. शेवटी जीव वाचवणं महत्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली आहे.
        राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी घेणं महत्वाचं असल्याचं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. सर्व अभ्यास करुन निर्णय घेतले जातील, असंही त्यांनी सांगितलं. मुंबई ही कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. अनेक राज्यांमधून इथं लोक येतात. त्यामुळे पुढचे आठ दिवस परिस्थिती पाहिली जाईल. त्यानंतर रेल्वे आणि विमानसेवा, तसंच क्वारंटाईनबाबत काही कडक निर्बंध आणावे लागतील, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

 

Advertisement

Advertisement