Advertisement

पत्याच्या क्लबवर धाड

प्रजापत्र | Thursday, 02/02/2023
बातमी शेअर करा

बीड - शहरातील सम्राट चौक येथे सुरू असलेल्या पत्याच्या क्लबवर काल रात्री शिवाजीनगर पोलीसांनी कारवाई करत 12 जुगार्‍यांना जेरबंद केले. गुप्त माहितीच्या आधारे शिवाजीनगर पोलीसांनी सम्राट चौकातील एका पत्याच्या क्लबवर काल रात्री धाड टाकत 12 आरोपींना जेरबंद करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये आरोपी शेख वाजेद शेख हसन, पठाण अफ्रोज, शुभम कवडे, सिध्देश्‍वर उबाळे, परमेश्‍वर डोईफोडे, शेख फारूक, शेख आसेफ, संतोषसिंग मठवाले, धनंजय काळे, अभिजीत सोन्नार, विशाल उबाळे, शेख आसेफ या आरोपींचा समावेश असुन सर्व आरोपी विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यांतगर्तग गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन ही कारवाई पोलीस निरीक्षक केतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रामदास काळे, पीएसआय प्रविण पाथरकर, पो.ह.विष्णु चव्हाण, गणेश परझने, सुदर्शन सारणीकर, विठ्ठल शिंदे, कुमार काळे, राठोड, महिलापोलीस भाग्यश्रीघोडके, चालक एएसआय रामा सानप, उगलमुगले यांनी केली.

Advertisement

Advertisement