Advertisement

कमी गुण असतानाही बनले 'हायटेक'मुळे 140 डॉक्टर

प्रजापत्र | Thursday, 02/02/2023
बातमी शेअर करा

बीड दि.2 (प्रतिनिधी)-येथील उमाकिरण शिक्षण संकुलमध्ये अनिल आणि सुनील या राऊत बंधुंनी हायटेक एज्युकेशन मार्गदर्शन केंद्र सुरु केले आहे.2022 मध्ये हायटेकमुळे कमी गुण असतानाही 140 विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांना भारतातच प्रवेश मिळाला असून राऊत बंधुंच्या मार्गदर्शन केंद्राला आता दिवसेंदिवस पालकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.

 

     मागील काही वर्षांपासून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी बीडमध्ये अनिल आणि सुनील या राऊत बंधुंनी हायटेक एज्युकेशन मार्गदर्शन केंद्र सुरु केले आहे.नीट परीक्षेत कमी गुण असतानाही राऊत बंधू विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय प्रवेश मिळवून देत आहेत. विशेष म्हणजे यासाठी ते केवळ कौन्सलिंग फी म्हणून 6 हजार रुपये घेतात. मागच्या काही वर्षात त्यांनी शेकडो मुलांना वैद्यकीय प्रवेश मिळवून दिले असून सन-2022 मध्ये तब्ब्ल 140 विद्यार्थी त्यांनी अल्प गुण असताना वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरवले आहेत. दरम्यान यामुळे मराठवाड्यातील अनेक पालक त्यांच्याकडे प्रवेश प्रक्रियाची माहिती घेण्यासाठी गर्दी करत असून सध्या हायटेकला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

 

 

नीट फॉर्म भरण्यापासून प्रवेश होईपर्यत आमची जबाबदारी-राऊत
सर्वांना माहिती असलेले राऊत बंधू यांचे हायटेक एज्युकेशन मार्गदर्शन केंद्र हे बीड मधील पहिले सर्व सोयीनियुक्त आणि सर्व माहिती देणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र आहे. नीट फॉर्म भरण्यापासून ते तुमचा कॉलेजमधील प्रवेश होईपर्यंत सर्व जबाबदारी घेण्याचं कार्य हे हायटेक एज्युकेशन करत आहे त्यामुळे सर्व पालकांना त्यांच्या मनामध्ये सर्व प्रश्नांचे उत्तर आणि प्रवेशाबाबतच्या सर्व अडचणी दूर करण्याचे जबाबदारी आमची असल्याची माहिती राऊत बंधुंनी दिली.

 

 

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठीही प्रयत्न
नीटच्या मार्क्सनुसार कोणत्या कॉलेजला कुठे नंबर लागेल किती फीस लागेल हे सर्व सांगण्याचे कार्य आणि योग्य मार्गदर्शन करण्याचे कार्य राऊत सर करत आहेत.यावर्षी 2022 मध्ये जी नीट परीक्षा झाली त्या नीट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले बहुतांशी सर्व विद्यार्थी राऊत सरांच्या हायटेक एज्युकेशन यांच्यामार्फत कोणत्याही कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेशास पात्र झाले .कमी मार्क्स असून सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे कॉलेज मिळाले. ज्या ठिकाणी दीड कोटी रुपये लागतात त्या ठिकाणी फिस टू फीस मध्ये बसून एकदम कमी खर्चामध्ये सुद्धा चांगलं कॉलेज त्यांना मिळालं. ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांना टॉप कॉलेज सुद्धा मिळवून देण्याचे कार्य राऊत सरांनी केलेले आहे.यासोबतच प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती सुद्धा मिळवून देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो.

 

 

विद्यार्थी-पालकांची थांबली परवड
बीडमधील सर्व पालकांना आधी लातूर औरंगाबाद पुणे मुंबई अशा मोठ्या शहराच्या ठिकाणी मार्गदर्शन घेण्यासाठी जावं लागायचं.परंतु या तीन वर्षापासून आपल्या बीडमध्ये हायटेक एज्युकेशनची सुरुवात झालेली आहे आणि त्या मार्फत बीड मधील सर्व पालकांना आपल्या मुलांसाठी कोणते कॉलेज कुठे मिळेल,कोणते सर्टिफिकेट लागतात किती फीस असते ,हॉस्टेल मेस कशी आहे , चॉईस फिलिंग यासाठी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन राऊत सर करत आहेत .बाहेरच्या राज्यात देखील प्रवेश मिळून देण्याचे कार्य राऊत सर करत आहेत.
 

Advertisement

Advertisement