बीड - शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी निघालेल्या एका विद्यार्थ्यावर मोकाट कुत्र्याने जीव घेणा हल्ला करत अक्षर: विद्यार्थ्याचे लचके तोडल्याची घटना बीड शहरातील खासबाग मधील सरसय्यद उर्दू शाळेच्या परिसरात बुधवारी (दि.1) दुपारीच्या सुमारास घडली. जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेमुळे मात्र पालकांसह नागरिकांमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे.
दरम्यान मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार वाढल्याने पालिका प्रशासनाला याचां बंदोबस्त करण्याची मागणी करुनही याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज ही घटना घडल्याने बीडकरांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीड शहरातील विविध भागासह सार्वजनिक ठिकाणे शाळा- महाविद्यालयाच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार वाढला आहे. कुत्र्यांचे टोळके नागरिकांवर हल्ले करुन चावा घेत असल्याच्या घटनांमध्ये मागिल काही दिवसांपासून वाढ झाली आहे. मोकाट कुत्र्यांचा बीड नगर परिषदेने बंदोस्त करावा अशी मागणी दिवसेंदिवस पालकांसह नागरिक करत आहेत. मात्र त्याकडे पालिका प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. परिणामी आज खासबाग परिसरातील सरसय्यद उर्दु शाळेतील एलकेजी मध्ये शिकत असलेला सय्यद तारेख असद (वय5) हा विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर घरी जात असतांना शाळेच्या परिसरात असलेल्या मोकाट कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करुन चावा घेतल्याची घटना घडली. यात हा चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.