माजलगांंव - तालुक्यातील गुंजथडी येथील शेतकरी मंचक नायबळ २एकर , बाळासाहेब नायबळ १ एकर अनंता मुळे ,१एकर पांडूरंग नायबळ२ एकर दादासाहेब नायबळ२ एकर प्रमोद नायबळ २ एकर निवृती नायबळ २ एकर दामोदर नायबळ २ एकर या ८ शेतकऱ्यांच्या तोडणीला आलेल्या ऊसाच्या शेतात विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या तारेत अचाक शॉर्टसर्किट झाल्याने १४ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना ३१ नोव्हेंबर मंगळवार रोजीच्या दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. अश्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात न भरून निघणारे नुकसान झाले आहे. सध्या मराठवाड्यात ऊस गळतीचा हंगाम सुरु असून सर्वात महत्वाच्या नगदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड मराठवाड्यामध्ये झाली आहे. तर तब्बल 14 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. शॉर्टसर्किट (Short Circuit) मुळे ही घटना घडल्याचे समोर आले असून ऊसाची अगदी काहीच दिवसांमध्ये तोडणी होणार होती. या शॉर्टसर्किटमुळे 8 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
प्रजापत्र | Wednesday, 01/02/2023
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा