Advertisement

बीडच्या सात तरुणांना काठमांडूत लुटले

प्रजापत्र | Tuesday, 31/01/2023
बातमी शेअर करा

बीड - राष्ट्रवादीचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे  हे आपल्या समर्थकांच्या व मतदारसंघातील जनतेच्या मदतीला कायम धावून जातात. आपल्या जाहीर सभांमधून त्यांनी केवळ राज्यातच नाही, तर परराज्यात अडकलेल्या बीडमधील व्यक्तीची आपण कशी मदत केली होती, याचे किस्से सांगितलेले आहेत.

 

 

आता नेपाळच्या काठमांडूमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या बीड जिल्ह्यातील सात तरुणांच्या मदतीसाठी आजारी असूनही धनंजय मुंडेची धावपळ सुरू आहे. त्याचे झाले असे की, दीपक सांगळे त्याच्या ७ मित्रांसह नेपाळमध्ये गेले होते. सध्या ते काठमांडू येथील प्रहरी व्रत पोलीस ठाण्यात अडकले आहेत.हे सर्वजण महाराष्ट्रातील (भारत) बीड जिल्ह्यातील असून काठमांडूमध्ये फिरत असताना त्यांना लुटण्यात आले होते. त्यांच्याकडे ना निधी आहे ना कुठला ग्राउंड सपोर्ट. अशावेळी त्यांनी ट्विट करत मदतीचे आवाहन केले होते. याची माहिती मिळताच सध्या अपघातामुळे विश्राती घेत असलेल्या धनंजय मुंडे यांनी त्या सर्व ८ मुलांना सुरक्षितपणे भारतात त्यांच्या घरी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.यासाठी त्यांनी भारत व नेपाळ सरकारला याची माहिती दिली. केंद्रीय विदेश मंत्री जयशंकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, बीड जिल्हाधिकारी, तसचे बीड पोलिसांना या संदर्भात माहिती देत त्वरित योग्य ती कारवाई करावी अशी विनंती केली. संबंधित तरुणांपर्यंत मदत पोहचवण्यासाठी दिपक सांगळे यांचा व्हाॅटस्अप नंबर देखील दिला आहे.
 

Advertisement

Advertisement