मुंबई-अजूनही कोरोना संपलेला नाही,आता दुसरी लाट येतेय ही लाट नसेल तर त्सुनामी असेल. आपल्याला अनेक गोष्टी उघडायच्या आहेत, पण यात राजकारण नको.पण काही लोक अजूनही हे उघडा ते उघडा म्हणताहेत, म्हणणे सोपे असते, जबाबदारीचे काय ? मी सगळे उघडतो,तुम्ही जबादारी घेताय का असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना केला आहे. मात्र सध्या तरी लॉकडाऊन होणार नाही असे संकेत त्यांनी दिली.
कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.ते म्हणाले अजूनही कोरोनाची लस नाही,कधी येईल माहित नाही. औषधी नाहीत.तरुण संक्रमित होतायत. आता महत्वाची वेळ आहे. लॉकडाऊन कोणालाच आवडत नाही. मलाही लॉकडाऊन सातत्याने करायचा नाही. पण काळजी घ्या, स्वतःहून कोरोनापासून चार हात लांब राहा.लॉकडाऊन,कर्फ्यू लावायची वेळ आणू नका. गर्दी टाळा,अनावश्यक बाहेर जाण्याचे टाळा,मास्क, सॅनिटायझर याचा वापर करा , हीच आपली त्रिसूत्री आहे असे ते म्हणाले.
कोरोनाच्या प्रश्नावर वेगवेगळ्या विषयावर राजकारण करत असलेल्या विरोधकांना मात्र ठाकरे यांनी टोला मारला. मला जनतेची काळजी आहे. उद्या रुग्णालये कमी पडली तर कोण वाचविणार? अमुक उघड म्हणता , पण जबाबादारी घेता का असा सवाल त्यांनी केला. शाळा सुरु करणे किंवा बंद करणे यावर मात्र यत्यंनी काहीही भाष्य केले नाही.
प्रजापत्र | Sunday, 22/11/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा