Advertisement

92 हजारांचा गुटखा जप्त

प्रजापत्र | Friday, 27/01/2023
बातमी शेअर करा

बीड - महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा बीडमध्ये सर्रासपणे विक्री होतांना दिसून येत आहे. आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाने गुटखा विक्री करणार्‍या दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 92 हजाराचा गुटखा जप्त केला. ही कारवाई काल (26 जानेवारी) रोजी केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथे करण्यात आली.
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत आहे. गुटख्याला बंदी असतांनाही गुटखा माफिया शासन- प्रशासनातील अधिकार्‍यांना हाताशी धरुन जिल्ह्यात सर्रास पणे गुटख्याची तस्करी केली जात आहे. आयपीएस पंकज कुमातव यांना चिंचोलीमाळी येथे गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाली हेाती. त्यांनी तत्काळ आपले पथक त्या ठिकाणी पाठवत कारवाई केली. यावेळी आकाश इंगळे (रा.कळम) धनराज चंदनशिव या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 92 हजाराचा गुटखा जप्त केला. त्यांनी तो गुटखा कोठून आणला याचा पोलिस तपास करत आहेत. ही कारवाई पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, पंकज कुमातव यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर,रामहरी भंडाणे, संजय टुले, विकास चोपणे यांच्यासह आदींनी केली.

Advertisement

Advertisement