बीड दि.२५ (प्रतिनिधी)-देशातील शेतकर्याच्या अनेक प्रलंबित प्रश्नावर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 26 जानेवारीला हरियाणा मध्ये भव्य किसान महा पंचायत आयोजित करून देशव्यापी आंदोलनाची सुरवात होत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाच्या हाकेला प्रतिसाद देत अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्यभर या आंदोलनात उतरत आहे त्याचा एक भाग म्हणून बीड जिल्हा किसान सभेच्या वतीने शेतकर्यांच्या देशपातळी वरील प्रश्नासोबत स्थानिक पातळीवरील प्रश्न घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज (दि.२५) माजलगाव, परळी, धारूर,वडवणी, येथील तहसील कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला, या प्रसंगी शेतकर्यांना केंद्र सरकार विरोधात 'चले जाओ चले जाओ मोदी सरकार चले जा' अश्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. शेतकर्यांच शेतमालाला दीडपट हमी भावाचा कायदा लागू करा,शेतकर्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या, केंद्रीय वीज विधेयक मागे घ्या,देशभरातील शेतकर्यांना पेन्शन योजना लागू करा, पीक विमा योजना पारदशी करून पीक विमा योजनेची रीतसर अंमलबजावणी करा, महाराष्ट्रातील अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकयांना आर्थिक मदत द्या,पीक विम्याच्या रकमा शेतकयांच्या खात्यावर त्वरित जमा करा, गायरान व देवस्थान जमिनीवरील काबीज गरीब शेतकर्यांच्या नावे ७/१२ करून त्यांना संरक्षण द्या,वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करून आदिवासीच्या हक्कांचे संरक्षण करा,गरीब शेतकरी शेतमजूर कामगार कुटुंबांना रेशनच्या धान्याचा पुरवठा चालू ठेवा,घरकुल वाटपाच्या योजनेला गती देऊन शेतकरी शेतमजुरांना व कामगारांना त्वरित घरकुल द्या, मागण्या या आंदोलनाद्वारे करण्यात आले आहेत, या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ अँड.अजय बुरांडे, जिल्हा सचिव कॉ मुरलीधर नागरगोजे, कॉ दत्तात्रय डाके,यांनी केले,पी एस घाडगे, पांडुरंग राठोड, गंगाधर पोटभरे,कॉ भगवान बडे, मुक्तेश्वर कडभाने, अँड.अशोक डाके, कॉ विशाल देशमुख, कॉ कृष्णा, सोळंके, डॉ सावळाराम उबाळे, जगदीश फरताडे, मदन वाघमारे, बालाजी कडभाने,प्रवीण देशमुख, सुदाम शिंदे, मुसद्दीक बाबा, सुहास झोडगे, लहू खारगे,यांच्यासह किसान सभेचे शेकडो कार्यकर्ते, व शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
प्रजापत्र | Wednesday, 25/01/2023
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा