Advertisement

दिल्ली-NCRसह 5 राज्यांत भूकंपाचे धक्के

प्रजापत्र | Tuesday, 24/01/2023
बातमी शेअर करा

दिल्ली - NCRमध्ये मंगळवारी दुपारी 2.28 वा. 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. त्यात जवळपास 30 सेकंद जोरदार झटके बसले. भूकंपाचे केंद्र नेपाळच्या कालिकाहून 12 किमी अंतरावर होते. त्याचा प्रभाव नेपाळ, भारत व चीनपर्यंत जाणवला. उत्तराखंडच्या डोंगराळ भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले. नववर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत राजधानीत भूकंप होण्याची ही तिसरी वेळ आहे. या भूकंपाचा प्रभाव दिल्ली-एनसीआरसह उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश व हरियाणाच्या काही भागात जाणवले.

यापूर्वी 5 जानेवारी सायंकाळी 7.56 मिनिटांनी दिल्ली-एनसीआर व काश्मीरमध्ये भूकंप झाला होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.9 नोंदवण्यात आली. त्याचे केंद्र अफगाणिस्तानच्या फैजाबादहून 79 किमी दूर हिंदूकुश पर्वत रांगांत होते.

नववर्षाच्या सुरुवातीलाही भूकंप

नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी रोजी रात्रीही दिल्लीत भूकंप आला होता. राष्ट्रीय भूकंप मापन विज्ञान केंद्राने सांगितले की, 1 जानेवारी रोजी मध्यरात्री 1.19 च्या सुमारास 3.8 तीव्रतेचा भूकंप आला. त्याचे केंद्र हरियाणाच्या झज्जरमध्य होते. त्याची खोली जमिनीखाली 5 किमी आत होती. पण सुदैवाने त्यात कोणत्याही प्रकारची हाणी झाली नाही.

नोव्हेंबरमध्ये 3 वेळा आला होता भूकंप

तत्पूर्वी, 29 नोव्हेंबर रोजी दिल्ली-एनसीछआरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यावेळी रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.5 एवढी होती. दिल्लीच्या पश्चिम क्षेत्रात जमिनीखाली 5 किलोमटीर खोल भूकंपाचे केंद्र होते.

12 नोव्हेंबर रोजी दिल्ली-एनसीआर व उत्तराखंडमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. भूकंपानंतर नागरिकांनी घरे व कार्यालयांबाहेर धाव घेतली होती. तेव्हा दिल्लीसह नोएडा, गाझियाबाद, बिजनौरमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले होते.

दिल्ली-एनसीआरमध्ये 3 फॉल्ट लाइन

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये 3 फॉल्ट लाइनमध्ये आहेत. जिथे फॉल्ट लाइन असते, तिथेच भूकंपाचे एपिसेंटर असते. दिल्ली - एनसीआरमध्ये जमिनीखाली दिल्ली-मुरादाबाद फॉल्ट लाइन, मथुरा फॉल्ट लाइन व सोहना फॉल्ट लाइन आहे. संशोधकांच्या माहितीनुसार, टेक्टोनिकल प्लेट्समध्ये होणाऱ्या हालचालींमुळे भूकंपाचे धक्के जाणवतात.

याशिवाय उल्का प्रभाव व ज्वालामुखी स्फोट, माइन टेस्टिंग व न्यूक्लिअर टेस्टिंगमुळेही भूकंप होतो. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता मोजली जाते. त्यानुसार, 2.0 व 3.0 रिश्टर स्केलचा भूकंप सौम्य मानला जातो. तर 6 तीव्रतेचा भूकंप शक्तिशाली मानला जातो.

Advertisement

Advertisement