माजलगाव- माजलगाव नगर परिषद हद्दीतील ओपन स्पेस वरील अतिक्रमण येत्या आठ दिवसांत हटविण्यात यावे. अन्यथा दि.३१ जानेवारी २०२३ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर उपोषण करण्याचा इशारा आमदार प्रकाश सोळंके यांनी उपविभागीय अधिकारी यांना आज (मंगळवारी) निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, माजलगाव नगरपरिषद हद्दीतील ओपन स्पेस वरील अतिक्रमणे दुर करण्याबाबत मुख्याधिकारी व न.प. कर्मचारी यांनी कुठलिही कारवाही केलेली दिसुन येत नाही. ओपन स्पेस वरील अतिक्रमणे सात दिवसात दुर करण्याबाबत मुख्याधिकारी, न. प. माजलगाव यांना आदेशित करावे. अतिक्रमणे दूर करण्याची कारवाई सात दिवसात न झाल्यास आमदार प्रकाश सोळंके यांनी कार्यकर्त्यांसह उपविभागीय कार्यालय माजलगाव समोर दि.३१ जानेवारी २०२३ रोजी उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी यांना आज दि.२४ मंगळवारी निवेदनाद्वारे दिला आहे.
बातमी शेअर करा