Advertisement

तीन राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर

प्रजापत्र | Wednesday, 18/01/2023
बातमी शेअर करा

 केंद्रीय निवडणुक आयोगाने बुधवारी त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्या. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सर्व राज्यांचे निकाल 2 मार्च रोजी जाहीर होतील.
 या निवडणुकांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही राज्यांमध्ये बहुमताचा आकडा 31 आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, तिन्ही राज्यांमध्ये महिला मतदारांचा सहभाग जास्त आहे, येथे निवडणूक काळात हिंसाचाराच्या घटना आजपोवेतो कमीच राहल्या. निष्पक्ष निवडणुकांसाठी आम्ही व आमची यंत्रणा या ठिकाणी कटिबद्ध आहोत. .

नॉमिनेशन :

त्रिपुरा - 21 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत.
मेघालय-नागालॅंड - 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारी.
नाव मागे घेण्याची तारीख

त्रिपुरा - 2 फेब्रुवारी.
मेघालय-नागालॅंड- 10 फेब्रुवारी
 निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचे अपडेट्स...

तिन्ही राज्यांमध्ये 9 हजार 125 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
ग्रामीण भागाबद्दल बोलायचे झाले, तर 2018 च्या तुलनेत 82% अधिक मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
तीनही राज्यांतील 376 मतदान केंद्रे महिला कर्मचारी हाताळतील. तीन राज्यांत 62.8 लाख मतदार आहेत.
त्यापैकी 31.47 लाख महिला मतदार 97 हजार 80 वर्षांवरील मतदार आहेत. प्रथमच मतदारांची संख्या 1.76 लाख आहे.
ईशान्येपासून या वर्षी 9 राज्यांत निवडणुका

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यांव्यतिरिक्त एकूण 9 राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. ईशान्येनंतर कर्नाटकात एप्रिल किंवा मे महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.
याशिवाय 40 सदस्यीय मिझोरम विधानसभेचा कार्यकाळही या वर्षी 17 डिसेंबर रोजी संपत आहे. तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामध्ये जानेवारी 2024 मध्ये वेगवेगळ्या तारखांना मुदत संपेल.
याशिवाय 40 सदस्यीय मिझोरम विधानसभेचा कार्यकाळही या वर्षी 17 डिसेंबर रोजी संपत आहे. तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामध्ये जानेवारी 2024 मध्ये वेगवेगळ्या तारखांना मुदत संपेल.
आता जाणून घ्या तीन राज्यांची स्थिती...

 

1. मेघालय विधानसभा, जागा- 60, बहुमत- 31
मेघालयात 2018 मध्ये 59 जागांवर निवडणूक झाली. काँग्रेसला सर्वाधिक २१ जागा मिळाल्या होत्या. भाजपला येथे केवळ 2 जागा मिळू शकल्या. नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीईपी) 19 जागा मिळाल्या. पीडीएफ आणि एचएसपीडीपीने मिळून सरकार स्थापन केले. त्यांनी मेघालय डेमोक्रेटिक अलायन्स (MDA) ची स्थापना केली. गेल्या तीन महिन्यांपासून येथील पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसने 40 आणि एनपीपीने 58 उमेदवारांची यादी आधीच जाहीर केली आहे.

 

2. त्रिपुरा विधानसभा, जागा- 60, बहुमत- 31

राज्यात 2018 मध्ये 59 जागांवर निवडणुका झाल्या. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. 35 जागा मिळाल्या. डाव्यांचा 25 वर्षांचा बालेकिल्ला भाजपने उद्ध्वस्त केला होता. यापूर्वी बिप्लब देव यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते, परंतु मे 2022 मध्ये माणिक साहा यांना मुख्यमंत्री करण्यात आले. आगामी निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी सीपीएम आणि काँग्रेसने हातमिळवणी केली आहे. ममता बॅनर्जींचा TMC हा आणखी एक मोठा पक्ष आहे, जो भाजपला टक्कर देऊ शकतो.

3. नागालँड विधानसभा, जागा-60, बहुमत-31
 नागालँडमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे सरकार आहे. नेफियू रिओ हे मुख्यमंत्री आहेत. NDPP 2017 मध्ये अस्तित्वात आला. 2018 मध्ये दोन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व युती केली होती. त्यानंतर एनडीपीपीने 18 तर भाजपने 12 जागा जिंकल्या. यानंतर NDPP ने NPP आणि JDU सोबत सरकार स्थापन केले. गेल्या वर्षी दोन्ही पक्षांनी संयुक्त निवेदनात एनडीपीपी 40 आणि भाजप 20 जागांवर एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते.

Advertisement

Advertisement