माजलगाव : येथील तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी आलेले चार बॉक्स औषध पैकी दोन बॉक्स गोदामातून चोरीला गेले असल्याचे समोर आले आहे. एकूण ४५ हजार किमतीचे हे औषध होते. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१३ डिसेंबर २०२२ रोजी ४ वाजता चे सुमारास शासकीय MAIDC कार्यालय बीड येथून शासकीय वाटपासाठी तुरीवर फवारणी साठी आलेले औषध ईमामेक्टिन बेंजोएट 5 % एस. जी औषध शेतक-याना वाटप साठी चार बॉक्स आले होते. प्रत्येक बॉक्स मध्ये 100 ग्रॅम वजनाचे 50 नग औषध बाटली तुर पिक वाटपासाठी आले होते. ते चार बॉक्स रजिस्टरला नोंदी घेवुन शासकीय तालुका कृषी कार्यालय परभणी फाटा हिंगनवाडी शिवारातील गोदाममध्ये ठेवण्यात आले. मात्र यातील दोन बॉक्स औषध अज्ञात चोरट्याने गोदामाचा फ्लायवूडचा दरवाजा बाजूला सारून चोरून नेले. ज्याची किंमत खालील प्रमाणे ईमामेक्टिन बेंजोएट 5 एस.जी औषध बेंच नंबर 8/22 एका बॉक्समध्ये 100 ग्रॅम वजनाचे 50 नग प्रति नग किंमत 450 रुपये असा दोन बॉक्सचे एकुण 45,000 हजार रुपये आहे.
या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कृषी सहाय्यक दिक्षा मदन सरवदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध. सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.