बीड दि.१० (प्रतिनिधी) : शहरातील खासगबाग येथील भाजी मार्केटमधून एका वृद्ध भाजीविक्रेत्या महिलांच्या हातातून वीस हजाराची पिशवी घेवून पसार झालेल्या त्या चोरट्याला बीड शहर पोलिसांनी मोठ्या शताफिने पकडून सोमवार (दि.९) रोजी रात्री जेरबंद केले. पोलिस निरीक्षक रवि सानप यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे त्यांचे नागरिकांमधुन अभिनंदन केले जात आहे.
शहरातील लक्ष्मण नगर मधील लताबाई बाजीराव कातखडे (वय 55) या भाजीपाला विक्री करतात. शनिवारी (दि.7) सकाळी 06.30 वाजण्याच्या सुमारास खासबाग मधील आडत मार्केट मधून भाजी पाला खरेदी करण्याकरीता त्या गेल्या होत्या. भाजीपाला खरेदी करण्याकरीता आडत मार्केट येथे फिरुन पाहत असताना एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळ येत त्यांच्या हातात असलेली वीस हजार रुपयांची पैशाची पिशवी लताबाईंच्या हाताला झटका देऊन हिसकाऊन अज्ञात चोरटा पसार झाला. त्यावेळी चोर- चोर म्हणुन लताबाई यांनी मोठ्याने आरडा ओरडा केल्यानंतर त्यांच्या जवळ आडत मार्केट येथील लोकांनी गर्दी केली. अज्ञात चोरट्याचा आजुबाजुला शोध घेतला. परंतु आढळून आला नाही. दरम्यान याप्रकरणी लताबाईं कातखडे यांच्या तक्रारीवरुन बीड शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस निरीक्षक रवि सानप यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात चोरट्याचा दोन दिवसांपासून पोलिस शोध घेऊ लागले होते. दरम्यान गुप्त खबर्यामार्फत पोलिसांना त्या चोरट्याची माहिती मिळाल्यानंतर पोनि. रवी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून मोठ्या शताफिने चोरटा सय्यद कलीम (रा. मोमीनपुरा, बीड) याला ताब्यात घेतले. शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदाचा रवि सानप यांनी पदभार स्विकारल्यानंतर शहरातील अवैध धंद्यावाल्यांसह गुन्हेगारी क्षेत्राला लगाम लागला असून गुन्हेगारी प्रवत्तींचे धाब्बे दणाणले आहेत. भुरट्या चोरींच्या घटनांना मोठ्या प्रमाणात आळा बसला असून सय्यद कलीम या चोरट्याला जेरबंद करुन केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांनी पोनि. सानप यांचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे.
बातमी शेअर करा