आज शनिवार आठवड्यातील शेवटचा दिवस. मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर जे कमी-जास्त होत होते. आज या दरात पुन्हा 500 रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. कमॉडिटी मार्केट तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग, डॉलरच्या संख्येत झालेली वाढ आणि जागतिक आर्थिक मंदीची भीती या कारणांमुळे सोन्या-चांदीचे दर सातत्याने वाढतायत. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 55,820 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 69,140 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
शहर सोने 1 किलो चांदीचा दर
बीड 55750 70000
मुंबई 51,168 69,140
पुणे 51,168 69,140
नाशिक 51,168 69,140
नागपूर 51,168 69,140
दिल्ली 51,086 69,020
कोलकाता 51,104 69,050
जागतिक बाजारातील सोन्या-चांदीचे दर
जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याची स्पॉट किंमत 0.35 टक्क्यांनी वाढून $1,689.01 प्रति औंस झाली. शुक्रवारीही सोन्याचा भाव 0.41 टक्क्यांनी घसरला होता. सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीची स्पॉट किंमत आज 1.86 टक्क्यांनी वाढून 19.76 डॉलर प्रति औंस झाली आहे. तथापि, शेवटच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच शुक्रवारी चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाली.