Advertisement

सोन्यासारखी जमीन गेली, १२ वर्ष न्यायालयात खेटे घातले , आता निकाल लागूनही मिळेना मावेजा

प्रजापत्र | Friday, 06/01/2023
बातमी शेअर करा

बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या भूसंपादन मावेजाचा विषय दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरही शेतकऱ्यांना मावेजा मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातूनच धारूर तालुक्यातील आरणवाडी साठवण तलावासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या, त्या शेतकऱ्यांनी मावेजासाठी थेट आत्मदहनाची परवानगी मागितली आहे. 
धारूर तालुक्यातील आणवाडी साठवण तलावासाठी अनेक शतकऱ्यांच्या जमिनी गेल्या.विशेष म्हणजे या जमिनीसाठी शेतकऱ्यांना बाजार भावापेक्षा अत्यंत कमी दरमंजूर करण्यात आला. त्यासाठी शेतकऱ्यांनी तब्बल १२ वर्ष न्यायालयीन लढा दिला. आता न्यायालयाने देखील या शेतकऱ्यांना मावेजा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरही पाटबंधारे विभागाने चालढकल केली . मात्र न्यायायालयाने ३ जानेवारीपर्यंत न्यायालयात पैसे जमा करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले होते. पाटबंधारे विभागाने त्याचेही पालन केलेले नाही. यामुळे आता या प्रकल्पसासाठी  जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे आत्मधनाची परवानगी मागितली आहे. प्रजासत्ताक दिनी आपण आत्मदहन करणार असल्याचे निवेदन शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिले आहे. 

 

Advertisement

Advertisement