Advertisement

'मंत्री' बॅंकेची निवडणूक बिनविरोध

प्रजापत्र | Friday, 06/01/2023
बातमी शेअर करा

बीड दि. ६ (प्रतिनिधी) : येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बॅंकेची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. सुभाषचंद्र सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवडणुकीत विरोधकांना उमेदवार देखील देता न आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. 

नुतन संचालक मंडळात आदित्य सारडा, आदिती सारडा, गिरीश गिल्डा,शुभम चितलांगे, संतोष लहाने, अरुण मुंडे, राहुल खडके, दिनेश देशपांडे, शेख मोहम्मद सलीम, प्रल्हाद वाघ, रघुनाथ चौधरी, सुधाकर वैष्णव, अंजली पाटील, राम गायकवाड, सतीश धारकर यांचा समावेश आहे. बॅंकेच्या अध्यक्षाची निवड १३ जानेवारी रोजी होणार आहे. 

या निवडणूकीच्या माध्यमातून सभासदांनी पुन्हा एकदा सुभाषचंद्र सारडा यांच्यावर विश्वास टाकला आहे. 

काही वर्षापूर्वी रिझर्व्ह बॅंकेने 'मंत्री' बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर बॅंकेवर प्रशासक मंडळ नेमण्यात आले होते. त्यानंतर बॅंकेच्या संदर्भात गुन्हे  देखील दाखल करण्यात आले. मात्र या साऱ्या पार्श्वभूमीवर सभासदांनी आपण पुन्हा सुभाषचंद्र सारडा यांच्यासोबत असल्याचेच दाखवून दिले आहे.

Advertisement

Advertisement