Advertisement

'वतन ट्रान्सपोर्ट'ला उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

प्रजापत्र | Thursday, 05/01/2023
बातमी शेअर करा

औरंगाबाद दि. ५ (प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्यातील कथित टँकर घोटाळ्याच्या प्रकरणात वतन ट्रान्सपोर्ट या कंत्राटदारांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. वतन ट्रान्स्पोर्टची याचिका दाखल करून घेतानाच या प्रकरणातील फौजदारी कारवाईला उच्च न्यायालायने स्थगिती दिली आहे.
बीड जिल्ह्यात टँकरद्वारे पाणी पुरवठ्यात घोटाळा झाल्याची तक्रार आ. संदीप क्षीरसागर यांनी केली होती. या प्रकरणाच्या प्रस्थमिक चौकशीत कंत्राटदार वतन ट्रान्सपोर्ट यांना क्लीनचिट देण्यात आली होती. मात्र नंतर याच विषयात विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर पाणीपुरवठा मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या अहवालानंतर मंत्र्यांनी या प्रकरणात वतन ट्रान्सपोर्टला दोषी ठरवत काळ्या यादीत टाकण्याचे आणि फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशाला वतन ट्रान्स्पोर्टच्या वतीने उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
याची सुनावणी न्या. मंगेश पाटील आणि न्या. एस. जी . चपळगावकर यांच्या पिठासमोर झाली. त्यात याचिकारट्यांना सुरुवातीला क्लिनचिट देण्यात आली होती. त्यानंतरही असे आदेश पारीत  झाले असून हे करताना याचिकाकर्त्यांना सुनावणीची संधी देखील देण्यात आली नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत वतन ट्रान्सपोर्ट विरुद्धच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

 

Advertisement

Advertisement