बीड: माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला मंगळवारी मध्यरात्री परळी शहरात अपघात झाला. यात धनंजय मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागला आहे. धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. आपली तब्बेत व्यवस्थीत असून काळजीचे कसलेही कारण नसल्याचे आ. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडे मंगळवारी सर्व कार्यक्रम आटोपून मध्यरात्री परळी शहरात येत होते. मध्यरात्री १३:३० च्या सुमारास त्यांच्या चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्याने त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात किरकोळ मार लागला असून आपल्या तब्बेतीबाबत काळजीचे कारण नसल्याचे स्वत: धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
बातमी शेअर करा