Advertisement

मेटेंच्या स्वप्नपूर्तीसाठी ताकदीने उभे राहू-फडणवीस

प्रजापत्र | Saturday, 31/12/2022
बातमी शेअर करा

बीड-दिवंगत विनायक मेटेंनी संपूर्ण जीवन समाजासाठी दिलं. राजकारणापेक्षाही समाजकारण त्यांनी अधिक केलं. मराठा आरक्षण,शिवस्मारक या स्वप्नपूर्तीसाठी ताकदीने उभे राहू असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 
बीड येथे अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठानच्या व्यसनमुक्ती रॅलीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अतुल सावे, चंद्रशेखर बावनकुळे, ज्योती मेटे, आ. सुरेश धस, आ.लक्ष्मण पवार, अक्षय मुंदडा,रमेश आडसकर,राजेंद्र मस्के, रमेश पोकळे, भिमराव धोंडे, कुंडलिक खांडे, तानाजी शिंदे, राजन घाग, प्रभाकर कोलंगडे, बी.बी.जाधव, आशुतोष मेटे,रामहरी मेटे, नारायण काशिद, अनिल घुमरे, सुहास पाटील, मनोज जाधव, राहुल मस्के यांची उपस्थिती होती. 
यावेळी फडणवीस यांनी आज मेटेंची कमतरता पदोपदी जाणवते.  २०१५ साली मेटेंनी संकल्पना मांडली, मला मुख्यमंत्री म्हणून निमंत्रित केले. त्यावेळी येता आलं नाही, नंतरही काही कारणाने रद्द झालं.आज आलोय, पण मेटे साहेब आपल्यात नाहीत.मेटेंची परंपरा पुढे जातेय म्हणून आलो असे सांगत समाजाला उभं करायच असेल तर सुखासिनतेपासून दुर व्यसनमुक्त तरुणाई निर्माण करण्याची गरज. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन करणं हे छूप युद्ध सध्या शत्रू करीत आहे, म्हणूनच व्यसनमुक्त समाज आवश्यक आहे असेही फडणवीस म्हणाले. 
प्रास्ताविकात ज्योती मेटे यांनी विनायक मेटेंचा पिंडच समाजकारणाचा होता, ते समाजकारणात झोकून देत. समाजकारणाच्या केवळ गप्पा न मारता प्रत्यक्ष कृतित उतरविणारे होते. स्वत:चा आणि कुटुंबातल्या इतरांचा विवाह सामुहिक विवाह सोहळ्यात. २०१५ पासून व्यसनमुक्तीवर काम सुरु केली. ती मोहीम नंतर व्यापक होत गेली. हाच विचाराचा वारसा पुढे घेऊन जात आहोत. नवीन समाज निर्मितीत पुढाकार घेत आहोत असे सांगितले.

 

Advertisement

Advertisement