Advertisement

घरफोडी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या जेरबंद

प्रजापत्र | Wednesday, 28/12/2022
बातमी शेअर करा

आष्टी-आष्टी व शिरूर कासार भागात घरफोडी करणारी टोळी अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होती. अखेर या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या टोळीच्या म्होरक्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी मुसक्या आवळल्या. 
आष्टी शहरातील मुर्शदपूर भागात ११७ डिसेंबर २०२२ रात्री 02.45 वाजेच्या सुमारास फिर्यादी अविनाश नानासाहेब पवळ वय 42 वर्षे व्यवसाय डॉक्टर (रा. मुर्शदपुर ता.आष्टी) हे घरामध्ये झोपलेले असताना दरवाजाची कडीकोंडा तोडून अनोळखी चार चोरटयानी घरामध्ये प्रवेश करुन काठीचा धाक दाखवून सोने व रोख रक्कम चोरी करुन घेऊन गेले. या फिर्यादवरूनआष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदरची बाब गंभीरतेने घेवून मा.पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले. सदर गुन्हयाचे अनुषंगाने पो.नि.स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पथकाने घटनास्थळी पाहणी करत तपास सुरु केला. 
आरोपी व मालाचा शोध घेत असतांना मा.पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, निबांळकर आसाराम भोसलेने ( रा.चिंचोडी पाटील ता.जि.अहमदनगर)  साथीदारासह चोरी केली आहे. यावरून मंगळवारी पोलिसांनी चिचोडी पाटील येथून  निबांळकर आसाराम भोसलेस ताब्यात घेतले. चौकशीत त्याने तीन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच पोलीस ठाणे शिरुर हद्दीमध्ये २ महिन्यांपूर्वी मानुर शिवारात सिध्देश्वर वस्तीवर व सिरसाट वस्तीवर मारहाण करुन चोरी केल्याची कबुली दिली. 
दरम्यान आरोपींकडून इतर जिल्हयातील गुन्हे देखील उघडकिस येण्याची शक्यता आहे.  पुढील तपास आष्टी पोलीस व स्था.गु.शा.चे पथक करीत आहे. ही कारवाई पोलीस निरिक्षक सतिष वाघ, पोउपनि भगतसिंग दुलत, पोह मनोज वाघ, प्रसाद कदम, रामदास तादंळे, पोना-सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे, विकी सुरवसे, अशोक कदम यांनी केली. 

 

Advertisement

Advertisement