किल्लेधारूर दि.२१(प्रतिनिधी) तालुक्यांतील गांजपूर ग्रामस्थांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या गांजपूर - तांबवा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी नुकतेच सरपंच म्हणून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांना पदभार न घेण्याचा इशारा दिला आहे.
गांजपूर - तांबवा या रस्त्यावर दाट लोकवस्ती असून खूप मोठे मोठे खड्डे आहेत. दोन चाकी,चार चाकी वाहने किंवा माणसांना पायी चालणे अवघड झालेले आहे. या रस्त्यावरील अडचणीच्या रहदारीमुळे अनेकांच्या जीवीताला धोका झालेला आहे. सरपंच कस्तूराबाई साला पवार यांची पारधी वस्ती याच रस्त्यावर आहे. या रस्त्यावरून दररोज गावात येवून कामकाज करणे अशक्य आहे. त्याच प्रमाणे शेतकरी महिला, पुरूष शाळकरी मुले यांना चालत जाणे येणे आवघड झालेले आहे. म्हणून गांजपूर - तांबवा रस्ता तात्काळ मजबुतीकरण व डांबरीकरण करावा अन्यथा सरपंच पदाचा पदभार घेणार नाहीत असे निवेदन गांजपूर च्या नवनिर्वाचीत सरपंच कस्तूराबाई साला पवार, सदस्या सुभद्राबाई आनंदराव मुंडे, शालूबाई बापूराव पारवे, गणेश डापकर यांनी राधाबिनोद शर्मा जिल्हाधिकारी बीड यांना दिले. या वेळी प्रा.ईश्वर मुंडे, वसंत मुंडे, विठ्ठल सिरसट, अंगद डापकर, सचिन डापकर, आशोक सिरसट, भिमा पवार, साक्राबाई पवार उपस्थित होते.