Advertisement

वाहतूक नियंत्रक एसीबीच्या जाळ्यात

प्रजापत्र | Friday, 16/12/2022
बातमी शेअर करा

बीड - महिला तक्रारदारास बडतर्फ न करता कर्तव्यावर परत घेण्यासाठी 1 लाख 20 हजारांची मागणी करण्यात आली. यापैकी 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाहतुक नियंत्रकास शुक्रवारी (दि.16) रोजी दुपारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड एसीबीच्या टीमने केली.

 

 

किशोर अर्जुनराव जगदाळे (वय 40 वर्ष वाहतुक नियंत्रक रा.प.बीड रा.स्वराज्य नगर ता.जि.बीड) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांचे विरुद्ध बीड आगार येथे सुरू असलेल्या चौकशीत तक्रारदार यांना बडतर्फ न करणे व कर्तव्यावर परत घेण्यासाठी वरिष्ठांशी बोलून मदत करण्यासाठी जगदाळे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 1 लाख 20 हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 30 हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः पंच साक्षीदार समक्ष स्वीकारली. यावेळी त्यांना लाच रकमेसह रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई बीड एसीबीच्या टीमने केली.
 

Advertisement

Advertisement