Advertisement

पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस

प्रजापत्र | Wednesday, 18/11/2020
बातमी शेअर करा

सातारा : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहेत. यात गेल्या दहा वर्षांपासूनचे विवरण द्यावे, असे नमूद करण्यात आले आहे. दिवाळीच्या एक दिवस अगोदर ही नोटीस आल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.गेल्या दहा वर्षातील संपत्तीचे वितरण द्या. त्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे. येत्या 21 दिवसात याचा खुलासा करावा, असे आयकर विभागाने यात नोटीसमध्ये म्हटलं आहे.
                         गेल्या दहा वर्षातील संपत्तीचे वितरण द्या. त्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे. येत्या 21 दिवसात याचा खुलासा करावा, असे आयकर विभागाने यात नोटीसमध्ये म्हटलं आहे.“दिवाळीच्या शुभमूर्हतावर मोदी सरकारच्या इन्कम टॅक्स विभागाने मलाही एक नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक नोटीस शरद पवारांना पाठवली होती. इन्कम टॅक्स विभाग हा केंद्राचा विभाग आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना अशाप्रकारे नोटीस पाठवल्या जातात. भाजपच्या कोणत्या नेत्याला नोटीस पाठवली आहे, याची माहिती नाही. मी मला पाठवलेल्या नोटीसला रितसर उत्तर देईन. ही रेगुल्यर नोटीस आहे,” असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.“सत्तेचा वापर कसा करायचा, तो कोणासाठी करायचा, हे भाजपला अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती आहे. सत्तेचा वापर कसा करायचा हे भाजपला चांगलेच जमते. केंद्रातील भाजपा सरकार विरोधी पक्षातील नेत्यांना नोटीस पाठवत आहे,” असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला

Advertisement

Advertisement