Advertisement

जिल्हा रुग्णालयात 11 महिन्यात 9 हजार रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

प्रजापत्र | Friday, 02/12/2022
बातमी शेअर करा

बीड दि.२ (प्रतिनिधी)-जिल्हा रुग्णालयामध्ये दररोज शेकडो रुग्ण उपचार घेतात. सर्वसामान्यांसाठी हे रुग्णालय अत्यंत चांगले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे आल्यापासून त्यांनी रुग्णालयात गोरगरीब रुग्णांच्या सेवेवर भर देत आरोग्य सुविधेत प्रचंड बदल केले. दरम्यान ११ महिन्यात 8 हजार 986 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 9 हजार 421 महिला डिलेव्हरीसाठी दाखल झाल्या होत्या. 5 हजार 206 नॉर्मल डिलेव्हरी झाली तर 3 हजार 86 महिलांचे सिझरींग झाले.

 

बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दररोज कित्येक रुग्ण उपचार घेतात. आवश्यक असणार्‍या रुग्णांना अ‍ॅडमिट करून त्यांच्यावर उपचार केले जातात. अपेंडिक्स, हर्निया, सिझर, डायलेसिस, थायरॉईड, गर्भ पिशव्या, आतड्या, हाडांचे ऑपरेशन रुग्णालयात होतात. अकरा महिन्यात रुग्णालयात 2 लाख 73 हजार 674 रुग्ण दाखल झाले होते. यामध्ये 1 लाख 31 हजार 34 रुग्ण अ‍ॅडमिट झाले. 8 हजार 986 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 9 हजार 421 महिला डिलेव्हरीसाठी अ‍ॅडमिट झाल्या होत्या. त्यापैकी 5 हजार 206 महिलांची नॉर्मल डिलेव्हरी झाली तर 3 हजार 86 महिलांचे सिझरींग झाले. 4 हजार 350 मुले व 3 हजार 826 मुली जन्माला आल्या. यासह इतर छोट्या-मोठ्या रुग्णांवरही रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरएमओ संतोष शहाणे, डॉ. राम आव्हाड, सुधीर राऊत, प्रकाश सानप, मेट्रन रमा गिगरी, संगीता महानोर, सुवर्णा बेदरे यांच्यासह अन्य कर्मचारी रुग्णांच्या उपचारासाठी रात्रंदिवस एक करत असतात.
 

Advertisement

Advertisement