Advertisement

विहीरीत आढळला विवाहितेचा मृतदेह

प्रजापत्र | Thursday, 24/11/2022
बातमी शेअर करा

बीड (प्रतिनिधी) - एका 36 वर्षीय विवाहीतेचा मृतदेह विहीरीत आढळुन आल्याची घटना आज सकाळी काळेगाव (ता.बीड) येथे उघडकीस आली आहे. दरम्यान काल रात्री मुलीने फोन केला होता. त्यावेळी तिला मारहाण सुरू होती. पती आणि सासुने मारहाण करून तिला विहीरीत फेकल्याचा आरोप मयत विवाहीतेच्या आईने केला आहे. या प्रकरणी 302 चा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भुमिका आईसह माहेरकडील नातेवाईकांनी घेतली होती.
बीड तालुक्यातील पिंपळनेर पासून जवळच असलेल्या काळेगाव येथील शोभा रावसाहेब मुंडे (वय 36) यांचा मृतदेह आज सकाळी जवळच असलेल्या एका विहीरीत आढळुन आला. सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला आहे. मात्र आपल्या मुलीला तिच्या पतीसह सासुने मारहाण करून विहीरीत फेकुन देत जिवे मारल्याचा आरोप केला आहे. काल रात्री तिने मला फोन लावुन तो बाजुला ठेवला होता, त्यावेळी तिला मारहाण सुरू होती. त्यामुळे मारहाण करून तिला विहीरीत फेकले असुन या प्रकरणी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी अशी मागणी मयत शोभा यांच्या आई पंचफुला नवनाथ बांगर यांनी केली आहे. यामध्ये गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भुमिका मयत महिलेच्या माहेरकडील नातेवाईकांनी घेतली आहे.

 

Advertisement

Advertisement