Advertisement

कोश्यारींचं नेहरू शर्ट आणा आणि घ्या एक लाखाचं बक्षीस

प्रजापत्र | Wednesday, 23/11/2022
बातमी शेअर करा

बीड दि.२३ (प्रतिनिधी)-रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारत देशाचे आदर्श आहेत. त्यांच्याबद्दल भाजपा आणि त्यांच्या नेत्यांनी नेहमीच वादगृस्त वक्तव्य केली आहेत. सविधानीक पदावर असणार्‍या भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने तिव्र शब्दात निषेध करत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आले. यावेळी कोश्यारींना पदावरुन हटविण्याची मागणी करण्यात आली. तर कोश्यारीचा नेहरु शर्ट बीडमध्ये आणणार्‍यांना एक लाखाचे बक्षिसबीड काँग्रेसच्या वतीने जाहिर करण्यात आले.

 

           छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आदर्श राजे आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक शब्द वापरले आहेत. संवैधानिक पदावर असणारे कोश्यारी हे जाणीवपुर्वक वारंवार महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल असे अवमानकारक शब्द वापरत आहेत. भारतीय जनता पार्टी सुडाचे राजकारण करून सर्वसामान्य लोकांना उद्ध्वस्त करत आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने निदर्शने केली. या वेळी बोलताना ते म्हणाले की, भगतसिंग कोश्यारी यांचे नेहरू शर्ट जो बीड जिल्ह्यात आणील त्याला आपण एक लाख रुपये बक्षीस देऊ. या वेळी भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते त्रिवेदी यांचा निषेध करण्यात आला. त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, ओबीसीचे जिल्हाध्यक्ष प्रा. संभाजी जाधव, तालुकाध्यक्ष रमेश सानप नवनाथ थोटे, तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे, राहुल जाधव, दादासाहेब बनसोडे, परवेज कुरेशी, आसिफ शेख, विष्णू मस्के, सुनील काळे, अमोल पाठक, गणेश गगणे, दत्ता जाधव, अविनाश डरपे, मनोज गलांडे, शेख शकील, शेख गफ्फार, विष्णू मस्के, शेख अमीर, रमेश सानप, रणजित देशमुख   दीपक  शिरसाठ, अशोक बहिरवाळ, सय्यद नसीर, शेख जमीर, गुलाबराव देवक, अ‍ॅड. गणेश करांडे, शेख अफसाना, प्रा अनिल जाधव, अमजद कुरेशी अमोल पाठक  शियम भाई संतोष दौंड गणेश गगने मारुती गलांडे, पपू जाधव यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Advertisement

Advertisement