Advertisement

दूधविक्रेत्या युवकाचा संशयास्पद मृत्यु

प्रजापत्र | Wednesday, 23/11/2022
बातमी शेअर करा

बीड दि.२३ (प्रतिनिधी)-बीडकडे मोटारसायकलवर दूध घेवून येणाऱ्या युवकाचा निरगुडी (ता. पाटोदा) येथील डोंगरी पुलाजवळ संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना बुधवारी (दि.२३) सकाळी उघडकीस आली. मयत युवकाच्या डोक्यावर वार झाल्यासारखी जखम असल्याने हा घातपात असावा असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.  

 

       पाटोदा तालुक्यातील उखंडा येथील कृष्णा दिलीप जाधव (वय-१८) हा बुधवारी (दि.२३) सकाळी मोटारसायकल क्रमांक (एम.एच.१२.सी.यु. २९१३) वरून दूध घेवून बीडकडे येत होता. निरगुडी डोंगरी पुलाजवळ त्याचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना घडली. कृष्णाचा अपघात झाला की घातपात ? हे शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येणार आहे. कृष्णाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. मयत कृष्णाच्या डोक्यावर वार झाल्यासारख्या जखमा आढळल्याने हा घातपात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अपघातामध्ये वार झाल्यासारख्या जखमा होत नाहीत असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
 

Advertisement

Advertisement