Advertisement

डॉक्टराचे घर फोडून 70 हजारांचा ऐवज, इंजिनिअरचा मोबाईल तर व्यापार्‍याच्या खिशातून 30 हजार लंपास

प्रजापत्र | Monday, 21/11/2022
बातमी शेअर करा

बीड (प्रतिनिधी) - चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले असुन शहरात एकाचदिवशी चोर्‍यांच्या ३ घटनांची नोंद झाली आहे. बीडमध्ये एकाडॉक्टराचे घर फोडून 70 हजार रूपयांचा एैवज तर एका इंजिनिअरचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. पिंपळवाडी येथील एका व्यापार्‍याच्या खिशातून 30 हजार रूपये लांबवण्यात आले. 

 

 

बीड शहरातील डॉ.प्रशांत नागरे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी नामांकीत कंपनीची घडी, बोरची शॉटगन असा एकुण 70 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी नागरे यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हादाखल झाला आहे. शिवाजीनगर भागातील इंजि.प्रितम शिंदे यांचा घरातील रॅकमध्ये ठेवलेला 15 हजार रूपयांचा मोबाईल चोरट्याने लंपास केला तर पिंपळवाडी येथील साऊंड सिस्टीमचे व्यापारी शाहेद बाबु शेख यांच्या खिशातील 30 हजार रूपये बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचीघटना बीड बसस्थानकात घडली. 

Advertisement

Advertisement