Advertisement

विजेच्या धक्क्याने मालवाहू जीपने घेतला पेट

प्रजापत्र | Monday, 21/11/2022
बातमी शेअर करा

गेवराई - तालुक्यातील आडगाव येथे जनावरांना चारा आणण्यासाठी जाणाऱ्या मालवाहू गाडीला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने विजेचा शॉक लागून पाच मजूर गंभीर जखमी झाले आहेत. एका मजुराची प्रकृती चिंताजनक असून यामध्ये मालवाहू जीप जळून खाक झाली आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली.

 

गेवराई तालुक्यातील आडगाव येथील हे मजूर जनावराला चारा आणण्यासाठी जात होते. यावेळी उजव्या कालव्यावर त्यांच्या गाडीला विद्युत तारेचा स्पर्श झाला आणि यामध्येच गाडीने पेट घेतला.यात पाच मजूर विजेता शॉक लागून जखमी झाले. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 

Advertisement

Advertisement