बीड दि.२० (प्रतिनिधी)-रोटरी क्लब सारख्या संस्था सेवाभाव ठेवून कार्य करतात समाजासाठी उत्तरदायित्व म्हणून केलेले कार्य सर्वांना फायद्याचे ठरते, शिक्षण आरोग्य आणि वंचितांना सहाय्य करण्याचे काम रोटरीच्या माध्यमातून होत असते अशा संस्था समाजाचा आधार असतात असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.
मागील दोन दिवसांपासून सुरू झालेल्या रोटरी क्लब ऑफ बीड, माहेश्र्वरी प्रगती मंडळ व आदित्य हॉस्पिटल, बीड द्वारा आयोजित मूळव्याध, भंगदर, फिशर व नासुर ई. रोगांची तपासणी व क्षारसुत्र पध्दतीने शस्त्रक्रिया शिबिराचा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते समारोप झाला.यावेळी बोलताना माजी मंत्री क्षीरसागर म्हणाले की रोटरीच्या माध्यमातून सेवाभाव ठेवून सामाजिक कार्य करत असताना आपण समाजाचे उत्तरदायित्व म्हणून काम करतो ही भावना ठेवणे आवश्यक आहे सर्वांच्या सहकार्याने गरजूंना मदत करणे शिक्षण आरोग्य आणि वंचितांना सहाय्य करण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून रोटरीच्या माध्यमातून होत आहे अशा संस्था समाजाचा आधार असतात सर्वच कामे शासन करू शकत नाही सामाजिक संस्थेच्या वतीने समाजात अनेक कामे चांगले होत असतात दूरदर्शन रोगावर उपचार आणि निदान आवश्यक आहे खर्चिक बाबीमुळे अनेक रुग्ण उपचारासाठी पुढे येत नाहीत त्यांना जीवदान मिळवून देण्याचे काम वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ लोक करत आहेत, स्वतःच्या व्यवसायातून वेळ काढून सामाजिक कार्यासाठी वेळ देणे खूप मोलाचे काम आहे बीडच्या रुग्णांना रोटरीच्या वतीने मोठा दिलासा आणि आधार मिळत असल्याचे ते म्हणाले, यावेळी बीडला शासकीय महाविद्यालय व्हावे यासाठी आपण आग्रही मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितलेयावेळी गुजरात अहमदाबाद येथून आलेल्या डॉ. देवेंद्र शहा व यांच्या टीम ने दोन दिवसात २३२ तपासणी व ९० शत्रक्रिया केल्या हे खरच प्रशंसनीय आहे. या घटनेची बीडकर नक्कीच दखल घेतील.
यावेळी डॉ देवेंद्र शहा ,डॉ उपाध्ये ,सुभाषचंद्र सारडा ,आदित्य सारडा ,प्राचार्य भूतडा,सत्यनारायण लाहोटी ,रोटरी अध्यक्ष कल्याण कुलकर्णी ,सचिव सुनील जोशी ,या प्रोजेक्टचे शिबिर प्रमुख सुरज लाहोटी प्रोजेक्ट चेअरमन प्रमोद निनाळ, प्रोजेक्ट चेअरमन राम मोटवानी,राजेंद्र मुनोत ,या शिबिरा करता सहकार्य करणारे डॉ रमेश घोडके व उर्मिला घोडके,अरुण नाना डाके. माजी अध्यक्ष वाय जनार्दन राव ,अभय कुमार कोटेचा, विश्वनाथ माणूसमारे ,मुकुंदराव कदम ,अक्षय शेटे ,गणेश मुळे ,बबनराव शिंदे,संदीप खोड,विलासराव बडगे ,संकेत कदम ,गणेश साळुंखे ,सुमित जयस्वाल ,सुनील खंडागळे ,कृष्णा खांडे ,ओम प्रकाश लोहिया ,शांतीलाल पटेल ,रत्नाकर शिरसागर ,तुकाराम वायभट ,विकास उमापूरकर ,अमर डागा ,सी ए लड्ढा,सी ए गोपाल कासट माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जेथलिया विष्णुदास बियाणी,द तिरूमला कुटेग्रुपचे राहुल ढोले व त्यांची सर्व टीम यांचेही या प्रोजेक्ट करता सहकार्य लाभले त्याचप्रमाणे छत्रपती राजश्री शाहू बँकेचे सहकार्य लाभले याशिवाय आदित्य एज्युकेशन ट्रस्ट व त्यांचे आयुर्वेद हॉस्पिटल व त्यांच्या संपूर्ण टीमचे या सहकार्य लाभले शेवटी आभार कल्याण कुलकर्णी यांनी मानले