Advertisement

उत्पत्ती एकादशीनिमित्त वैद्यनाथास भाविकांची अलोट गर्दी

प्रजापत्र | Sunday, 20/11/2022
बातमी शेअर करा

परळी वै.दि.२० (प्रतिनिधी)-उत्पत्ती एकादशी व आळंदी यात्रा निमित्त प्रभू वैद्यानाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी रविवारी भाविकांची  प्रचंड गर्दी झाली होती.हजारो भाविकांनी रांगेत थांबून प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले तसेच वैद्यनाथ मंदिर जवळील संत जगमित्र नागा मंदिरातही भाविकांची गर्दी झाली होती.  

 

                        
उत्पत्ती एकादशी व आळंदी यात्रा असल्याने हजारो वारकऱ्यांनी परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले.रांगेत थांबून एक तासाच्या आत दर्शन झाले असे भाविकांनी सांगितले.रविवारी सकाळपासूनच  वैद्यनाथ मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढवावा लागला तसेच वैद्यनाथ मंदिरातिल खाजगी सुरक्षा रक्षकांनी कडक बंदोबस्त ठेवल्याने हजारो भक्तांना दर्शन घेणे सुलभ झाले,वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी राजेश देशमुख ,विश्वस्त नागनाथराव देशमुख हे मंदिरात भाविकांच्या सोयीसाठी दीर्घकाळ थांबून होते.

 

Advertisement

Advertisement