Advertisement

हाताची चालाकी करून एटीएममधून लांबवले ४५ हजार

प्रजापत्र | Sunday, 20/11/2022
बातमी शेअर करा

माजलगाव दि.२० (प्रतिनिधी) - एटीएमचा वापर करत असलेला एक खातेधारक एटीएम मध्ये आला व थेट भामट्यालाच म्हणाला मला एक हजार रुपये काढून दया, भामट्याने हात चालाकी करत त्या खातेधारकाला दुसरे एटीएम हातात थोपटून त्याचे खाते रिकामे केले. ही घटना माजलगांव शहरातील नविन बसस्थानकासमोरील एटीएम मध्ये घडली. दोन भामटे सिसिटीव्ही मध्ये कैद झाले असून पोलीस पुढील तपास करीत आहे.

 

 

शेख माजेद शेख दौला वय-32 वर्षे रा.अशोक नगर माजलगांव हा मजुर पैसे काढण्यासाठी माजलगांव शहरातील नविन बसस्थानकासमोर असलेल्या एसबीआय एटीएममध्ये गेले होते. मात्र त्यांना पैसे काढता आले नाही. त्यावेळी तेथे दोन इसम आले असता शेख म्हणाले की मला माझ्या खात्यातून एक हजार रुपये काढून दया, भामट्यांनी एटीएम मशीन मध्ये कार्ड टाकायला लावला. पिन ही टाकायला लावला. मात्र पुढील प्रकिया चुकीची करुन या एटीएममध्ये पैसे नसल्याचे सांगीतले. अन् अलगद एटीएमची अदला बदल करून तश्याच कलरचे दुसरे एटीएम हातात दिले. आणि थोड्या वेळातच शेख यांच्या अकाऊंटमधील सर्व रक्कम म्हणजे 42 हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी शेख यांनी माजलगांव शहर पोलीसात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञात दोन भामट्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनी पालवे हे करत आहे.
 

Advertisement

Advertisement